hero

आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या...

सर्व सामान्य जनतेला, छोट्या व्यापाऱ्याला, दुकानदाराला व्यापार किंवा उद्योगाला किंवा माध्यम उत्पन्न गटाला, दैनिक उत्पन्न होत असते. त्यांना आपल्या गर्जाकरिता सहज बचत करून भांडवल जमा करता यावे व आपले उद्दिष्ट साध्य करता यावे या उद्देश्याने बचत करण्यास साह्यभूत होणारी ही योजना गायत्री अर्बन क्रेडिट कॉ. ऑप. सोसायटी ली. नागपूर सादर करीत आहे. या मागील उद्देश असा कि खातेदाराला थेंब थेंब पैसा जमा करून त्याचा उपयोग एकमुक्त रकमेने करता यावा.

नियमावली

दैनिक बचत ठेवीची मुदत १ वर्ष राहील व करारानुसारच व्याज देण्यात येईल.
संस्थेतर्फे नेमलेल्या एजन्ट जवळ दैनिक रक्कम गोळा करण्याचे प्रमाणपत्र आहे असे अधिकृत एजन्ट संस्थेच्या वतीने रोज दैनिक हफ्त्याची रक्कम वसूल करतील.
महिन्याच्या अखेरीस प्रत्येक खातेदाराने त्या महिन्याच्या बाकी संस्थेत येऊन तपासून घ्यावी. तसेच एजन्टनी देखील खबरदारी घ्यावी. आपल्या रकमेच्या सुरक्षिततेसाठी रोजच्या रकमेची तपासणी खातेदारांनी करून घ्यावी.
दैनिक हफ्त्याचा भरणा रोजच्या रोज झालाच पाहिजे आणि रक्कम नियमित न भरल्यास मुदतीनंतर संस्थेत खात्यात जमा केली जाईल.
जे खाते ६ महिन्यांनी आत बंद होत असेल त्या खातेदाराकडून १०% एजन्ट कमिशन व ५% इंसिडेंटल चार्ज २०/- रु. पासबुक चार्ज वसूल करण्यात येईल. तसेच ६ महिने व ९ महिन्याच्या आत बंद होणाऱ्या खातेदाराकडून २०/- रु. किरकोळ खर्च करण्यात येईल.
जे खातेदार १ वर्षानंतर खाते बंद करीत असेल तर त्या खातेदारास व्याजसहित पूर्ण रक्कम देण्यात येईल.
दैनिक बचत ठेव खात्यावर जमा असलेल्या रकमेच्या ८०% पर्यंत खातेदाराला दैनिक बचत ठेव कर्ज मिळू शकेल. त्यावर दर शेकडा १६% व्याज राहील परंतु हर कर्ज २ पेक्षा अधिक वेळा घेता येणार नाही. दैनिक बचत ठेवीवर कर्ज मिळेल.
खाते सुरु असताना दैनिक ठेवीची रक्कम व मुदत लिहून घ्यावी लागेल. जर खातेदार नियम क्र. १९ मध्ये दर्शविलेला तक्त्यानुसार जास्त किंवा कमी रकमेची भरणा करीत असल्यास त्यास पूर्ण रकमेवर प्रॉडक्ट पद्धतीने ३% व्याज देण्यात येईल.
वरील नियमाप्रमाणे द्यावयाची कर्जाची रक्कम रु. ५००/- पेक्षा कमी असणार नाही. कर्ज घेताना खात्याचे पासबुक सोबत आणल्या खेरीज कर्ज मिळणार नाही.
दैनिक ठेवीवर दिल्या जाणाऱ्या व्याजाचे दर वेळोवेळी ठरविण्याचा अधिकार संचालक मंडळाला राहील.
दैनिक बचत ठेवीची मुदत संपेपर्यंत जर कर्जाची पूर्ण रक्कम व्याजासहित परतफेड न झाल्यास कर्जाची बाकी रक्कम आणि त्यावरील व्याज दैनिक ठेवी मधून कपात करून घेऊन उरलेली रक्कम खातेदारास परत करण्यात येईल.
एजन्ट रोज जी रक्कम वसूल करेल त्याची पावती एजन्टकडून दिली जाईल. पावती आणि पासबुक एजन्ट कडून मिळाल्यास खातेदाराने संस्थेच्या कार्यालयात त्वरित तक्रार करावी. आपण दिलेल्या रक्कमेची नोंद करून घ्यावी.
संस्थेचे पासबुक हरवल्यास खातेदाराला रु. २०/- भरून नवीन पासबुक मिळू शकेल.
खाते उघडताना खातेदाराने जमा असलेल्या रक्कम ज्याला द्यावयाची असेल त्या वारसदाराने पूर्ण नाव व पत्ता स्पष्ट नमूद करावा मात्र तो वारसदार अज्ञान नसावा.
संयुक्त खाते असल्यास व त्यावरील एका खातेदाराचा मृत्यु झाल्यास या कारणास्तव खाते बंद करण्यात येणार नाही. ह्यात असलेल्या खातेदारांनी किंवा वारसदाराने मुदत संपेपर्यंत रक्कम भरली पाहिजे. मुदत संपल्यानंतर ठेवीची रक्कम खातेदारांना किंवा वारसदारांना देण्यात येईल.
प्रत्येक खातेदाराने या बाबतीत संस्थेचे नियम वाचले असून त्यांना ते मान्य आहेत असे समजले जाईल. या योजनेचे नियमात कोणतीही सूचना न देता बदल करण्याचा व त्यात नवीन भर घालण्याचा अधिकार संस्थेने स्वतः कडे ठेवला आहे.
ठेवीतून कर्जात पैसे जमा केल्यास २% ज्यादा व्याज लागेल.
खाते उघडल्यापासून सलग १ महिना कोणताही व्यवहार न झाल्यास व खाते अनियमित असल्यास खाते बंद करून निष्क्रिय खाते म्हणून वर्ग करण्यात येईल व त्यासाठी पासबुकाची व संमतीची आवश्यकता राहणार नाही.

संचालक मंडळ

Shri Raju Madewar

श्री. येमेन्द्र बिसेन

अध्यक्ष

Shri Raju Madewar

श्री. जयराम बैगणे

उपाध्यक्ष

Shri Raju Madewar

श्री. प्रदीप सावरकर

संचालक

Shri Raju Madewar

श्री. विनाेद साकाेरे

संचालक

Shri Raju Madewar

श्री. अशाेेक खंडागडे

संचालक

Shri Raju Madewar

श्री. गाेविंद तेलरांधे

संचालक

Shri Raju Madewar

श्रीमती. ममता बिसेन

संचालिका

Shri Raju Madewar

श्रीमती रमाबाई बैगणे

संचालिका