कोणत्याही व्यक्तीला बचत खाते उघडता येईल, परंतू एकाच नावाने दोन खाते उघडता येणार नाही.
दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती संयुक्त खाते उघडू शकतात.
अज्ञानातर्फे त्याच्या पालकास हे खाते उघडता येईल. परंतु त्यासाठी अज्ञानाच्या जन्मतारखे विषयीचा दाखला द्यावा लागेल.
खाते उघडण्याबद्दल अर्जामध्ये अर्जदाराने आपले नाव, पत्ता व धंदा लिहावा.
पासपोर्ट साईझ लेटेस्ट दोन फोटो, ओळखपत्र आणि ऍड्रेस प्रूफ आवश्यक आहे.
खाते उघडताना संस्थेचा बचत ठेव खातेदार साक्षीदार म्हणून असावा.
खाते उघडताना खाते धारकास प्रत्यक्ष हजर राहावे लागेल.
खातेदार निरक्षर असल्यास आपल्या सोबत एक किंवा अधिक साक्षीदार आणून त्यांच्या समोर जाहीरनाम्यावर अंगठा निशाणी करून द्यावी लागेल. तसेच पैसे काढताना देखील साक्षीदारासमोर अंगठा करावा लागेल.
प्रत्येक खातेदारास नियमावली समजली असल्याबाबत आणि नियम मंजूर असल्याबाबतचा जाहीरनामा सही करून द्यावा लागेल.
खाते चालू ठेवण्यासाठी रुपये ५००/- सदोदीत खात्यात ठेवावे लागतील. खाते बंद करतेवेळी संपूर्ण रक्कम व्याजासह खातेदारास परत करण्यात येईल.
खातेदारास कमीत कमी रुपये १००/- खात्यातून काढण्याचा किंवा भरण्याचा अधिकार राहील.
आठवड्यातून फक्त तीन वेळा पैसे काढता येईल.
खाते उघडल्यापासून ३ वर्षात कोणत्याही प्रकारची उलाढाल खातेदाराने केली नसल्यास असे खाते अन-आँपरेटेड खात्याला वळते केले जाईल व अश्या अन-आँपरेटेड खात्यावर खाते आँपरेटेड खात्याला वळते करण्याचा अधिकार संस्थेला राहील.
बचत खात्यावर दर साल दर शेकडा ५% प्रमाणे व्याज देण्यात येईल.हे व्याज प्रत्येक महिन्याची १० तारीख आणि शेवटची तारीख यामधील कमीत कमी जी शिल्लक असेल त्यावर आकारण्यात येईल.
रु. १०,०००/- चे वर रक्कम घ्यावयाची असल्यास आगाऊ सुचना द्यावी लागेल.
पैसे काढताना किंवा भरताना खातेदाराला आपले पासबुक सोबत आणावे लागेल. पैसे काढल्यावर किंवा भरल्यावर आपल्या पासबुकातील प्रविष्टी तपासून घेणे आवश्यक आहे. त्यात काही चूक दिसून आल्यास खातेदाराने ताबडतोब ती चूक संबंधी अधिकाऱ्याला दाखवून दुरुस्ती करून घ्यावी.